महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rajendra Pal Gautam Criticized BJP : भाजपला जेवढे खोटे गुन्हे दाखल करायचे आहे, ते करू द्या - राजेंद्र पाल गौतम - आप नेता राजेंद्र पाल गौतम पुणे पत्रकार परिषद

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Delhi Health Minister Satyendra Jain ) यांना न्यायालयाने 9 जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यावर दिल्लीचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम ( Rajendra Pal Gautam ) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'भारतीय जनता पक्षाच एकच अजेंडा आहे की त्याच्या विरोधात जो जो पक्ष उभा राहील, त्या पक्षाच्या विरोधात केंद्रीय यंत्रणा उभी केली जात असल्याचे ते म्हणाले.

Rajendra Pal Gautam Criticized BJP
Rajendra Pal Gautam Criticized BJP

By

Published : Jun 2, 2022, 7:27 PM IST

Updated : Jun 2, 2022, 8:18 PM IST

पुणे - दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Delhi Health Minister Satyendra Jain ) यांना न्यायालयाने 9 जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यावर दिल्लीचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम ( Rajendra Pal Gautam ) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'भारतीय जनता पक्षाच एकच अजेंडा आहे की त्याच्या विरोधात जो जो पक्ष उभा राहील, त्या पक्षाच्या विरोधात केंद्रीय यंत्रणा उभी केली जात आहे. आम्ही आत्ता हे बघत आहो की भाजपच्या खोट्या गुन्ह्यांची मर्यादा किती आहे. जेवढे खोटे गुन्हे दाखल करायचे, आहे ते करू द्या. आमच्या 25 आमदारांवर जस खोटे गुन्हे दाखल केले, ते सर्व गुन्हे न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे खोटं हे जास्त काळ टिकत नाही तर नेहेमी सत्याचाच विजय होतो.' पुण्यात आम आदमी पक्षाच्यावतीने येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात मेळाव्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया

काय म्हणाले राजेंद्र पाल गौतम -आज लोकांना माहीत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी स्वताला वेळोवेळी सिद्ध केलं आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत दिलेले वचन त्यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळेच नागरिकांनी आपला पंजाब दिले आणि अत्ता पुढे हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्र देखील देणार आहे. यामुळेच भाजप ही चलबिचल झाली असून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. असं देखील यावेळी राजेंद्र पाल गौतम यांनी म्हटलं आहे. तसेच येणाऱ्या 2024 च्या निववडणुकीसाठी आम आदमी पक्ष तयारी करत असून याची तयारी ही राष्ट्रीय स्थरावर सुरू असल्याच देखील यावेळी राजेंद्र पाल गौतम यांनी म्हटलं आहे. राज्यात जरी भाजप विरोधी सरकार असली तरी नागरिकांच्या जीवनात जे बदल व्हायला पाहिजे ते बदल होताना दिसत नाहीय. हे बदल केजरीवाल यांच्या मॉडेल नी संभव आहे. असं देखील यावेळी राजेंद्र पाल गौतम म्हणाले. येत्या डिसेंबर महिन्यात दोन राज्याचे निवडणुका होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग आप ला मिळत आहे. त्यामुळेच भाजप ही आमच्या नेत्यांवर बेकायदेशीर गुन्हा दाखल करत आहे, असं देखील यावेळी राजेंद्र पाल गौतम यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Aurangabad Water Issue : 'कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा'; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

Last Updated : Jun 2, 2022, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details