पुणे - काश्मीर येथील लष्करातील २४ मराठा बटालियनकडे १२ वर्षांपासून सिमावर्ती भागांत भारतीय सैनिकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना केल्यानंतर आता १३ व्या वर्षी पुण्यातील औंध येथे लष्कराच्या भागामध्ये भारतीय लष्करातील २४ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची २ फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. यावेळी दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून बटालियनकडे १ लाखाचा निधी सुपूर्द करण्यात आला आहे.
२४ मराठा बटालियनकडे - १२ वर्षांपासून २४ मराठा बटालियनकडे गणपती मूर्तीची स्थापना झाल्यामुळे सैनिकांना उर्जा मिळणार मिळाली आहे. ही मूर्ती बटालियनच्या मेजर सुभेदार दत्ता डांगे, सुभेदार मछिंद्र पाटील, शिपाई विनायक यादव, बटालियनचे धर्मगुरू मनीष शर्मा यांच्याकडे देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.