महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Airport : पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला; खराब धावपट्टीचा फटका - पुणे विमानतळावर सुखोईचा टायर फुटला

लोहगाव विमानतळावर सुखोई -30 MKI या लढाऊ विमानाचा उड्डाण भरत असताना अचानक टायर फुटला. त्यामुळे इतर उड्डाणावर मोठा परिणाम झाला. तात्काळ प्रशासनाने विमानसेवा बंद केली होती. विमानतळावर दररोज 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असतात. विमानसेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

Pune Airport
Pune Airport

By

Published : Mar 30, 2022, 5:02 PM IST

पुणे- पुणे विमानतळावर एका लढाऊ विमानाचा अचानक टायर फुटल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे काही वेळ धावपट्टी ठप्प झाली होती. खराब धावपट्टीमुळे ही घटना घडली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून युद्धपातळीवर दुरूस्ती करून धावपट्टी सुरू करण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

धावपट्टी खराब असल्याने घडली दुर्घटना - लोहगाव विमानतळावर सुखोई -30 MKI या लढाऊ विमानाचा उड्डाण भरत असताना अचानक टायर फुटला. त्यामुळे इतर उड्डाणावर मोठा परिणाम झाला. तात्काळ प्रशासनाने विमानसेवा बंद केली होती. विमानतळावर दररोज 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असतात. विमानसेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. धावपट्टी खराब असल्याने ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयएएफ च्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत साफसफाई करून विमानसेवा पूर्ववत केली. त्या

ABOUT THE AUTHOR

...view details