महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे महानगरपालिकेत कोरोनाच शिरकाव; महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण - पुणे महानगरपालिका कोरोनाबाधित अधिकारी

पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महानगरपालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

PMC
पुणे महानगरपालिका

By

Published : Jul 1, 2020, 2:36 PM IST

पुणे -शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महानगरपालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अगोदर पुण्यातील चार नगरसेवकांना व पालिकेच्या 179 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 12 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱयालाच कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे, त्या संबंधित विभागातील इतर कर्मचाऱ्यांचीही चाचणी करण्यात आली असून त्याचे अहवाल येणे बाकी आहे.

पुणे विभागातील 16 हजार 372 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण रुग्णसंख्या 26 हजार 974 झाली आहे. सध्या विभागात 9 हजार 531 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात आत्तापर्यंत 1 हजार 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बऱया होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 60.70 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 3.97 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details