पुणे राज्यातील अनेक गावांमध्ये एक गाव एक गणेश उत्सव पाहायला मिळतात.पण शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळे Ganesha Mandals Pune असतात. त्यात पुणे शहर म्हटल की पुण्याला एक वेगळीच संस्कृती आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव Ganeshotsav हे जगप्रसिद्ध असून शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात. सर्वत्र 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून यंदा बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वत्र जोरदार पद्धतीने होत आहे. कारण गेली दोन वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बधात साजरे करावे लागले, अश्यातच पुणे शहरातील धनकवडी येथील 9 गणेश मंडळांनी Ganesha Mandals In Pune एकत्रित सार्वजनिक गणेश मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेश मंडळाचा नवा इतिहाससन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अभिमान प्रत्येक कार्यकर्ताचा या उक्तीप्रमाणे शहरातील नऊ सार्वजनिक गणेश मंडळे एकत्रित येऊन नवा इतिहास रचत आहे. या मंडळांच्या माध्यमातून देशातील पहिल्या सर्वात मोठ्या एकत्रित सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक करण्यात येणार आहे. पुणे शहरातील पोलीस विभागाने केलेल्या आव्हानांचा सन्मान राखत धनकवडी येथील केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ,अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन हा नवा पायंडा पुण्यात नव्हे तर संपूर्ण देशात प्रथमच सुरू केला आहे. असा यावेळी मोहन नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध येवले यांनी सांगितले.