पुणे -नवले पूल परिसरात एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने 7 ते 8 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 6 जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस आणि वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घाव घेत वाहने बाजूला करण्याचे काम सूरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले पुलाकडे येत असताना 14 चाकी मालवाहू ट्रक भरधाव वेगाने शोभणी हॉटेलसमोर आला. त्यानंतर चालकाचे ट्रकवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली.