पुणे- मागील काही दिवसात पुणे शहरात रानगवे दिसल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. या घटनांची अजून चर्चा असताना आता हरणांचा कळपही दिसला आहे. शिवणे येथील आशीर्वाद सोसायटीत हा हरणाचा कळप दिसून आला.
पुण्यातील 'एनडीए' जंगलात विविध प्राण्यांचा वावर आहे. याच जंगलाला लागून शिवने येथे आशीर्वाद सोसायटी आहे. सोसायटी आणि जंगल यांच्यामधील भिंत कोसळल्याने हरणे थेट सोसायटीच्या आवारात प्रवेश करत आहेत. नागरिकही या आगंतूक पाहुण्यांचे स्वागत करताना दिसून येतात. मात्र, आजूबाजूला भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात असल्याने हरणांच्या जीवाला धोका असल्याचे या स्थानिक नागरिकांनी सांगितले.