महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोहण्याची पैज पडली महागात; पुण्याच्या भिडे पुलावरून उडी मारलेला तरूण गेला वाहून - भिडे पुल पुणे

मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. पाच वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी पाहण्यासाठी आलेल्या प्रकाशसिंह आणि असिभ यांच्यात पुराच्या पाण्यात पोहण्याची पैज लागली. त्यानुसार दोघांनीही भिडे पुलावरून नदीत उड्या टाकल्या. यातील असिभ हा पोहत किनाऱ्यावर आला तर प्रकाशसिंह पुराच्या पाण्यात वाहून गेला.

तरूण गेला वाहून

By

Published : Sep 8, 2019, 9:22 PM IST

पुणे- दुथडी भरून वाहणाऱ्या मुठा नदीत पोहण्याची पैज लावणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. भिडे पुलावरून उडी मारलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा(वय 20) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शर्यत लावलेला असिभ अशोक उफिल(वय 18) याला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले. हे दोघेही तरुण नारायण पेठेतील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत.


पुण्यातील धरणक्षेत्रात आज सकाळपासूनच पाऊस सुरू असल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक भिडे पुलावर जमतात आहेत. यातच आज पाच वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी पाहण्यासाठी आलेल्या प्रकाशसिंह आणि असिभ यांच्यात पुराच्या पाण्यात पोहण्याची पैज लागली. त्यानुसार दोघांनीही भिडे पुलावरून नदीत उड्या टाकल्या. यातील असिभ हा पोहत किनाऱ्यावर आला तर प्रकाशसिंह पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी येऊन असिभ याला ताब्यात घेतले. अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details