पुणे - मोबाईलवर बोलत पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींचे मोबाईल हिसकावणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 1 हजार रुपयांचे 4 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अशितोष प्रदिप परांडे (19 रा. दापोडी, पुणे), अभिषेक मुकुंद बारटक्के (20 रा. दापोडी) आणि मतीन जुबेर शेख (18 रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडे मोबाईल फोन हिसकावणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते भोसरी आणि सांगवी परिसरात मोबाईलवर बोलत पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीला हेरून दुचाकीवरून जात मोबाईल हिसकावून पोबारा करत असत. दरम्यान, चोरी केलेले मोबाईल फोन विकण्यासाठी काही अज्ञात आरोपी हे सृष्टी चौक पिंपळे गुरव येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख यांच्या पथकाने सृष्टी चौक येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडे एक दुचाकी आणि एक मोबाईल मिळाला. दरम्यान, त्यांच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता भोसरी आणि सांगवी परिसरात 4 मोबाईल हिसकावून पोबारा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि 4 मोबाईल असा एकूण 2 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील दोन तर भोसरी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, नागेश माळी. राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.
मोबाईलवर बोलणाऱ्या पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारे सराईत अटक - पथचाऱ्यांचे मोबाईल चोरणारे चोरटे
सराईत चोरांचे एक पथक मोबाईल बोलणाऱ्या पादचाऱ्यांचे मोबाईल चोरायचे. या सराईतांना पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
पुणे पोलीस