पुणे - महाराष्ट्रामध्ये काही भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संतत धार सुरू आहे. अशातच भीमाशंकर अभयारण्य परिसरातील घोटवडी गावाच्या (ता. खेड) बाजुने वाहणाऱ्या ओढ्यात एक आदिवासी शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध सुरु आहे.
भीमाशंकर अभयारण्य परिसरातील ओढ्यात शेतकरी गेला वाहून; शोधकार्य सुरु.. - bhimashankar Sanctuary
सध्या भिमाशंकर परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असुन ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पूल पार करत असताना पुलाचा अंदाज न आल्यामुळे एक शेतकरी वाहुन गेला.
सध्या भिमाशंकर परिसरात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असुन ओढे-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. ओढ्यात वाहुन गेलेल्या व्यक्तीचे नाव बाळु भिका बांगर (35, घोटवडी) असून ते बांगवाडी वरुन घोटवडीकडे जात असताना वाटेत एक पूल लागला. मात्र, ओढा भरून वाहत असल्याने पुलही दिसेनासा झाला होता. पूल पार करत असताना पूलाचा अंदाज न आल्यामुळे तो वाहुन गेला.
"घोटवडी गावाजवळील ओढा पुढे जाऊन आरळा नदीला मिळतो आणि सध्याच्या पावसामुळे ओढा व नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे, या परिसरात शोधकार्य करताना मोठ्या अडचणी येत आहेत. खेड तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाची टिम घटनास्थळी दाखल झाली असुन बांगर यांचा शोध सुरु आहे." अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी दिली.