महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात गजबजलेल्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - viral video

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक तरुणी हिराबाग चौकात मद्यधुंद अवस्थेत असून वाहने अडवत होती. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

viral video
viral video

By

Published : Aug 4, 2021, 10:27 AM IST

Updated : Aug 4, 2021, 12:02 PM IST

पुणे - पुण्यातील गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात एका मद्यधुंद अवस्थेत तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीने भर रस्त्यावर झोपून वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक तरुणी हिराबाग चौकात मद्यधुंद अवस्थेत असून वाहने अडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी या तरुणीला रस्त्यातून बाजूला केले. या तरुणीवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. वर्दळीचे ठिकाण असलेल्या टिळक रस्त्यावरच या तरुणीने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याने सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा -मनसुखच्या हत्येसाठी आरोपींनी 45 लाखांची सुपारी दिली, एनआयची कोर्टात माहिती

Last Updated : Aug 4, 2021, 12:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details