महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दारूच्या नशेत पोहायला गेलेला युवक इंद्रायणीत बुडाला

इंद्रायणी नदीत मद्यधुंद अवस्थेत पोहण्यास उतरलेला एक युवक बुडाल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाचे पथक त्याचा शोध घेत आहे.

By

Published : Aug 17, 2019, 4:45 PM IST

अग्निशामक दलाचे पथक शोध घेत आहे

पुणे- देहू येथील इंद्रायणी नदीत मद्यधुंद अवस्थेत पोहणे एकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोहण्यासाठी नदी पात्रात उतरलेला तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. कमलाकर रानडे (वय ३३ रा.खालुब्रे) असे त्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे. अग्निशामक दलाचे पथक कमलाकरचा शोध घेत आहे.

दारूच्या नशेत पोहायला गेलेला युवक बुडाला

कमलाकर रानडे हा एका खासगी कंपनीच्या बसवर चालक म्हणून कार्यरत आहे. कंपनीत कामगारांना सोडून आल्यानंतर तो देहूगाव शेजारून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी थांबला. मित्र किरण ठोसरला पोहण्यासाठी सोबत घेऊन जाणार होता. मात्र किरणने पोहण्यास नकार दिला. त्यामुळे कमलाकर एकटाच पोहण्यास उतरला. मात्र नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर त्याला दम लागला. त्यानंतर तो नदी पात्रात बेपत्ता झाला.दरम्यान पोहण्यास जाण्यापूर्वी कमलाकर दारू प्याला होता, अशी माहिती किरणने दिली.

कमलाकर हा दर शनिवारी आणि रविवारी भावाकडे जात होता. तर बाकीचे दिवस तो बसमध्येच झोपून काढत होता, असे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details