महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुणे पोलिसांच्या अभिलेखावर वेगळाच गुन्हा..? - आर्यन खान प्रकरण

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केले आहेत. मलिक यांनी आता समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर निशाणा साधला आहे. त्यांच्याविरोधात अमली पदार्थांच्या विरोधातील गुन्हा दाखल आहे, असे आरोप मंत्री मलिक यांनी केले. मात्र, याबाबत एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

पोलीस
पोलीस

By

Published : Nov 8, 2021, 6:53 PM IST

पुणे - राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केले आहेत. मलिक यांनी आता समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर निशाणा साधला आहे. त्यांच्याविरोधात अमली पदार्थांच्या विरोधातील गुन्हा दाखल आहे, असे आरोप मंत्री मलिक यांनी केले. मात्र, याबाबत एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

काय आहे नवाब मलिक यांचा आरोप

क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्सची केस नोंदवलेली आहे. पुण्यात ड्रग्सचे प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी या प्रकरणात उत्तर द्यावे, असेही मलिक यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी ही ड्रग्सच्या व्यवसायात सामील आहे की काय..? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागेल कारण तिच्या विरोधातील केस पुणे न्यायालयात प्रलंबित आहे. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचे म्हटले आहे.

पुणे पोलिसांच्या अभिलेखावर वेगळाच गुन्हा

पुणे पोलिसांनी 2008 मध्ये अंमली पदार्थांच्या विरोधातला गुन्हा दाखल केला आहे, असे आरोप मंत्री मलिक यांनी केले आहे. मात्र, वेगळाच गुन्हा दाखल झाला असल्याची नोंद पुणे पोलिसांच्या अभिलेखावर आहे.

कोणतीही प्रतिक्रिया नाही

नवाब मलिकांच्या आरोपनंतर क्रांती रेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पुणे न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. यामुळे याबाबत आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, माझी बहीण नबाव मलिक यांच्या ट्वीटला कायदेशीर उत्तर देईल.

हे ही वाचा -Aryan khan drug case : किरण गोसावीचा आणखी एक दिवस पोलिस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details