महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Crime : गुंड गज्या मारणेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, २२ वर्षीय तरुणीसोबत दोन वर्षे ठेवले शारीरिक संबंध - Pune NCP

आठ वर्षानंतर तुरुंगातून सुटका झालेला गुंड गज्या मारणे याचा मुलगा प्रथमेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे याने दोन वर्षे विविध ठिकाणी नेऊन इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एका २२ वर्षीय तरुणीने केला आहे. या तक्रारीवरुन सिंहगड पोलिस ठाण्यात प्रथमेशवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याची आई देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य आहे.

son of a goon Gajanan Marne
गुंड गज्या मारणेच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

By

Published : Mar 23, 2022, 6:49 AM IST

पुणे- पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे ( goon Gajanan Marne ) याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे ( Prathamesh Marne ) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे याने जवळपास २ वर्ष विविध ठिकाणी नेऊन माझ्या मनाविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास मला मजबूर केले, असे सांगत फिर्यादीने सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रथमेश मारणे याने आपली आई जयश्री मारणे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) अधिकृत प्रवेश केला होता. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला होता.


काय आहे प्रकरण

या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादनुसार २०२० ते २०२२ या दोन वर्षांदरम्यान प्रथमेश मारणे याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत, अश्लील व्हिडिओ देखील बनवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मित्रातील कॉमन फ्रेन्ड्स मधील एकजण प्रथमेश मारणे हा असून आधी तरुणीसोबत ओळख वाढवली व त्यानंतर त्या तरुणीला फिरायला घेऊन जात तिच्या मनाविरुद्ध तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. प्रथमेशने तरुणीच्या नकळत तिचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन वर्षे झालेल्या शारीरिक छळानंतर तरुणीने फिर्याद दिली आहे, त्यानुसार सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे ३७६, ५०४, ५०६ कलमांंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वीच प्रथमेश मारणेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

काही दिवसांपूर्वी प्रथमेश मारणे याने त्याची आई अर्चना मारणे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ( Join NCP ) जाहीर प्रवेश केला होता. त्याअगोदर प्रथमेश मरणेची आई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( MNS Corporator ) कोथरूड भागाची नगरसेविका देखील राहिली आहे. तर वडील गज्या मारणे याची नुकतीच नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुण्यातला गुंड गज्या मारणेची आठ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका, जाणून घ्या प्रकरण

ABOUT THE AUTHOR

...view details