पुणे -बंदुकीच्या धाकाने अपहरण करून पतीने हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोपानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली असून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोपानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल - alankar police
8 जानेवारी आणि 10 फेब्रुवारी रोजी पुणे आणि इंदापूर येथील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
धमकी देत बलात्कार
8 जानेवारी आणि 10 फेब्रुवारी रोजी पुणे आणि इंदापूर येथील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी अधिक माहिती अशी, की पाच ते सहा वर्षापूर्वी फिर्यादी महिलेचे दुसरे लग्न झाले. परंतु पती-पत्नी दोघांतही काही कारणावरून वाद होते. याच कारणावरून पतीने बंदुकीचा धाक दाखवून पत्नीचे अपहरण केले. तिला चारचाकी गाडीत बसवून एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्यानंतर केसेस मागे घे अन्यथा संपवून टाकेल, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादी महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.