पुणे -शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत ( Udaya Samant ) यांच्यावर काल पुण्यातील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 10 आरोपींची नाव एफआरआय मध्ये असून या व्यतिरिक्त इतर 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे असून या आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे ( Bharti Vidyapeeth Police Station ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर ( Police Inspector Jagannath Kalskar ) यांनी दिली.
शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची काल कात्रज चौकातील सभा झाल्यानंतर तेथून काही कार्यकर्ते जात होते. त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची कार कार्यकर्त्यांना दिसली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काचदेखील फोडली.या प्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांनी अटक केली आहे.
या हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई करत शिवसेनेचे हिंगोली चे संपर्कप्रमुख बबन थोरात यांना ताब्यात घेतलं आहे. बबन थोरात हे शिवसेनेचे हिंगोली चे संपर्कप्रमुख आहे.बबन थोरात यांनी चितावणी कोर भाषण करत बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडा अस वक्तव्य केल होत.या वक्तव्यानंतर पडसाद उमठायला सुरुवात झाल्याने पुणे पोलिसांनी मुंबईमधून बबन थोरात यांना ताब्यात घेतलं आहे.