महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू - student who came for trekking to Raireshwar Fort died

रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असताना, एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम प्रदीप चोपडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुभमच्या जाण्याने त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना जबर धक्क बसाला.

रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

By

Published : Jul 30, 2022, 6:38 AM IST

पुणे:पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले असताना, एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शुभम प्रदीप चोपडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बारामतीतल्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षक रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जातं असताना ही घटना घडलीय.



बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनकनिष्ठ महाविद्यालयातले 46 विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि 4 शिक्षक ट्रेकिंगसाठी रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते. सकाळी 9 वाजता ते भोर-रायरेश्वर मार्गावरील कोर्ले याठिकाणच्या एका हॉटेलवर नाष्टा करण्यासाठी ते थांबले होते. नाष्टा झाल्यावर सगळे गाडीत बसण्यासाठी निघाले असताना शुभमला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्याला हृदय विकाराचा झटका आला.



यानंतर शुभमला लगेचचं जवळच्या अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. शुभम हा मूळचा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावाचा रहिवासी आहे. शिक्षणासाठी तो बारामती येथे राहत होता. शुभमच्या जाण्याने त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना जबर धक्क बसाला. अवघे 17 वर्ष वय असणाऱ्या शुभमचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातीय.

हेही वाचा - Pune Crime News : पुण्यात पूना हॉस्पिटलजवळ तरुणाचा खून; तीक्ष्ण हत्याराने केले वार, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे निष्पन्न

ABOUT THE AUTHOR

...view details