पिंपरी - चिंचवडमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने 4 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरीत 12 वर्षीय मुलाने केला 4 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार - पुणे क्राईम न्यूज
सांगवी परिसरात एकाच इमारतीत पीडित आणि अत्याचार करणारा मुलगा राहतात. हे दोघे इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. तिथं 12 वर्षीय मुलाने 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती पीडित मुलाने आईला दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात एकाच इमारतीत दोघे जण राहतात. पीडित आणि अत्याचार करणारा मुलगा हे दोघे इमारतीच्या पार्किंगमध्ये आले. तिथं 12 वर्षीय मुलाने 4 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची माहिती पीडित मुलाने आईला दिली. आणि आईने वडिलांना सांगितल्यावर संबंधित घटना उघड झाली. या दोन्ही मुलांचे पालक हे उच्चशिक्षित आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 12 वर्षीय मुलावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -सैदाबाद बलात्कार प्रकरण - आरोपीची आत्महत्या