महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे विभागात 896 कोरोनाबाधित रुग्ण, पुणे जिल्ह्यात 813 बाधित, 55 रुग्णांचा मृत्यू

पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून विभागात 135 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता अॅक्टीव रुग्ण 700 आहेत. आजपर्यंत विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे.

Pune
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

By

Published : Apr 22, 2020, 8:32 PM IST

पुणे- विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 896 झाली असून विभागात 135 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आता अॅक्टीव रुग्ण 700 आहेत. विभागात कोरोना बाधीत एकूण 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 896 बाधित रुग्ण असून 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 813 बाधीत रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 30 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 बाधीत रुग्ण आहेत. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 10 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 10 हजार 210 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 507 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 264 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 896 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 45 लाख 86 हजार 612 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 76 लाख 36 हजार 673 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 865 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details