महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Old Building Parts Collapsed In Pune : ८० वर्ष जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला, जीवितहानी नाही

पुण्यात ८० वर्षे जुन्या तीन मजली वाड्याचा काही भाग कोसळला ( Old Building Parts Collapsed In Pune ) आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळी अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले ( Firefighters Evacuate Six People ) .

Old Building Parts Collapsed In Pune
पुण्यात जुन्या वाडयाचे काही भाग कोसळले

By

Published : Jul 9, 2022, 1:47 PM IST

पुणे - पुणे शहरात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार ( Rain In Pune ) सुरू आहे. त्याच दरम्यान, आज (शनिवार) सकाळी शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथील ८० वर्ष जुना असलेला कारंडे यांच्या तीन मजली वाड्याचा काही भाग कोसळला ( 80 Years Old Building Part Collapsed ) आहे. या घटनेत अडकलेल्या सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले ( Firefighters Evacuate Six People ) आहे.

6 जण दुसर्‍या मजल्यावर अडकून होते -अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथील ८० वर्ष जुना असलेला कारंडे यांच्या तीन मजली वाड्याचा काही भाग कोसळला आहे. अशी माहिती आम्हाला सात वाजून पंधरा मिनिटांनी मिळाली. त्यानंतर आम्ही पुढील पाच मिनिटात घटनास्थळी पोहचलो. त्या वाड्यात तीन जणांचं कुटुंब राहण्यास आहे. त्यापैकी सहा जण दुसर्‍या मजल्यावर अडकून पडले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

जुन्या इमारतींना महापालिकेची नोटीस - दोनच दिवसांपूर्वी पुणे महापालिकेने ( Pune Municipal Corporation ) शहरातील जुन्या वाड्या आणि इमारतींना नोटीसा पाठवायला सुरुवात केली होती. शहरातील जुने वाडे धोकादायक परिस्थितीत असल्याने त्यांना रिकामे करा अथवा पाडा अशी नोटीस महापालिकेने सर्व वाड्यांवर लावली आहे. पुणे पालिकेकडून जवळपास 450 वाड्यांना नोटीस देण्यात आली आहे. पुण्यातील अती धोकादायक जुने वाडे पालिकेकडून पाडण्यातही आले आहेत. या वाड्याची अवस्था फार बिकट आहे.

एकूण 478 वाडे -महापालिकेने या जुन्या सर्व वाड्यांच्या श्रेणी केल्या आहेत. यामध्ये एकूण 478 वाडे आहेत. त्यातील 28 वाडे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत पाडले आहेत. मुळातच हे वाडे 70-80 वर्ष जुने आहेत. अत्यंत धोकादायक स्थितीत हे वाडे असून त्यातील अनेक वाडे कोणत्याही वेळी पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे ते खाली करणाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतु नागरिक वाडा पाडण्यास विरोध होतो. त्यामुळं वाडा कोसळण्याच्या घटना आहेत. पावसाचं जोर असाच राहिला तर आणखी धोका वाढू शकतो त्यामुळं पुण्यातील जुने वाडे पाडावेत यासाठी प्रयत्न करत आहे.

हेही वाचा -Maharashtra Politics : आगामी निवडणुकीची धाकधूक, बंडखोरांचे समर्थन, इच्छुकांची वाढली डोकेदुखी

ABOUT THE AUTHOR

...view details