पुणे- महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये आतापर्यंत ७५ कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यात सर्वजण निगेटिव्ह आहेत. महापालिकेकडून कोरोनासाठी सहा बेड तयार करण्यात आले आहेत.
आज(बुधवार) दुपारी चार इटली व अमेरिकेवरून आलेल्या प्रवाशांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल केले आहेत. खबरदारी म्हणून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत. सध्या नायडू रुग्णालयामध्ये ६, ससूनमध्ये ८, खासगी रुग्णालयामध्ये ३० अशा कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काळजी घ्या -