पुणे -राज्यासह पुणे शहरातही दिवसेदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात आज (शुक्रवारी) 2856 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. गेल्या 3 महिन्यातील सर्वाधिक मोठी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- शहरात दिवसेंदिवस वाढत आहे रुग्ण
पुणे शहरात दिवसेदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. दिवसभरात 628 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. शहरात आज कोरोनाने 06 मृत्यू झाले आहे. शहरातील 02 तर शहराबाहेरील 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही 9792 वर पोहचली आहे.
हेही वाचा -Mumbai Police Corona : मुंबईत ओमायक्रॉनचा कहर! 24 तासांत तब्बल 'इतक्या' पोलिसांना झाली कोरोनाची लागण