पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर संक्रमणशील क्षेत्रातील संचारबंदीत शिथिलता - corona lockdown
पुण्यात 69 प्रतिबंधात्मक ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या क्षेत्रात मात्र संचारबंदी पूर्वीप्रमाणेच राहील. या परिसरातील केवळ अत्यावश्यक दुकानेच सकाळी 10 ते 2 या वेळेत सुरू राहतील. याशिवाय या परिसरात लागू असलेले इतर निर्बंधही पूर्वीसारखेच लागू असतील..
पुणे- शहरात 69 अशी ठिकाणी आहेत, जेथे कोरोनाचे सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. हा भाग प्रतिबंधित (ContInment) भाग म्हणून ओळखला जातो. याशिवाय शहरातील इतर भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी आहे. या भागातील संचारबंदी 4 मे पासून शिथिल केली जाणार आहे. या भागातील अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकाने उघडण्यास प्रशासनाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय एकाच रस्त्यावरील अथवा गल्लीतील जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर फक्त पाच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.