पुणे -कोरोनाच्या संकटासोबतच आता राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे, राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आहेत. शहर आणि जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत असताना आता म्युकरमायकोसिसचे संकट डोकेवर काढत आहे. कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागल झाल्याचे समोर आले आहे.
म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे तब्बल ६२० रुग्ण आढळून आले असून, म्युकरमायकोसिसच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या आजारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २७ मृत्यू झाले आहेत. तर अनेक रुग्णांनी आपली दृष्टी गमवाली आहे. पुणे जिल्ह्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण क्षेत्रात आतापर्यंत ६२० रुग्ण आढळून आले आले आहेत. यातील ५६४ रुग्णांवर वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २९ जण या आजारातून बरे झाले आहेत. या आजावरील उपचार हे अतिशय महाग आहेत, तसेच या आजारावर उलब्ध असलेल्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागातील सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केले आहे.
पुण्याला म्युकरमायकोसिसचा विळखा हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी सध्या आंदोलन नको, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका