पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली असली तरी त्यांच्या हल्लेखोरांना अद्यापही शिक्षा झालेली नाही. यामुळे दाभोळकर कुटुंबीय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच मंगळवारी स्मृतिदिनानिमित्त पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 6 वर्षे पूर्ण; 'अंनिस'कडून निषेध व्यक्त - डॉ. नरेंद्र दाभोळकर बातमी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या उपस्थितीत मंगळवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यामधील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी 2 अज्ञात हल्लेखोरांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या घटनेचा प्राथमिक तपास केला होता. मात्र, त्यानंतर या घटनेचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला. सीबीआयने नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी काही आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये नवीन पुरावे मिळाल्याचा दावा सीबीआयच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या उपस्थितीत मंगळवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.