पुणे -विभागातील 5 लाख 91 हजार 731 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 21 हजार 268 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 166 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकूण 16 हजार 371 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा -
पुणे जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 4 लाख 10 हजार 129 रुग्णांपैकी 3 लाख 90 हजार 473 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 490 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.21 टक्के आहे.
सातारा जिल्हा -
सातारा जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 58 हजार 976 रुग्णांपैकी 55 हजार 838 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 285 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा -