महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे विभागातील 5 लाख 90 हजार 625 कोरोनाबाधित रुग्ण बरे; पाहा सविस्तर आकडेवारी - पुणे विभाग कोरोना आकडेवारी

पुणे विभागातील 5 लाख 90 हजार 625 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 19 हजार 854 झाली आहे.

corona
कोरोना

By

Published : Mar 2, 2021, 10:24 PM IST

पुणे -विभागातील 5 लाख 90 हजार 625 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 19 हजार 854 झाली आहे. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 12 हजार 866 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱया रुग्णांचे प्रमाण 95.28 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 4 लाख 8 हजार 918 रुग्णांपैकी 3 लाख 89 हजार 486 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 10 हजार 271 आहेत. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण 95.25 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 58 हजार 918 रुग्णांपैकी 55 हजार 791 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 274 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 53 हजार 27 रुग्णांपैकी 50 हजार 347 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 836 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 844 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 514 रुग्णांपैकी 46 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 760 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 50 हजार 477 रुग्णांपैकी 48 हजार 413 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 319 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 199 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 865, सातारा जिल्ह्यात 195, सोलापूर जिल्ह्यात 77, सांगली जिल्ह्यात 22 तर कोल्हापूर जिल्ह्यात 40 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details