पुणे -देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा ( Dedication ceremony Shila temple ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते पार पडला. हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर चला जाणुन घेऊया शिळा मंदिराबद्दल. या मंदिराची उंची 42 फूट आहे. तसेच मंदिरातील जगतगुरू संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) यांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. देशामध्ये सध्या उंचच उंच मूर्ती, पुतळे उभे करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. या परिस्थितीत तुकोबारायांची मूर्ती मात्र 42 इंचाची ठेवून हा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 42 ह्या आकड्यालाही वेगळा संदर्भ आहे, तो असा की, जगदगुरू तुकाराम महाराजांचं वय 42 वर्षांचंच होतं.
शिळा मंदिरातच संत तुकाराम महाराजांची पहिली मूर्ती अन 36 कळस -मंदिरात स्थापन केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती बरोबर 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती पिंपरी चिंचवडचे शिल्पकार चेतन हिंगे यांनी तयार केली आहे.
शिळा मंदिर कसं आहे -सर्वोदय भारत शिल्पकला कन्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. मंदिराची उंची 42 फूट आहे. यासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.
हेमाडपंथी मंदिर - हे मंदिर पूर्ण दगडात बांधले आहे. याची उंची साधारणपणे 42 फूटांपर्यंत आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. आपल्या वातावरणाला सूट होतील, असे दगड वापरण्यात आले आहेत. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर ( दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे. म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.