महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे शहरात 3,463 तर जिल्ह्यात 7 हजार 90 नवे पॉझिटिव्ह

पुणे शहरात 27 मार्चला (आज) दिवसभरात 3463 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 2584 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात 3,463 तर जिल्ह्यात 7 हजार 90 नवे पॉझिटिव्ह
पुणे शहरात 3,463 तर जिल्ह्यात 7 हजार 90 नवे पॉझिटिव्ह

By

Published : Mar 27, 2021, 10:27 PM IST

पुणे - पुणे शहरात 27 मार्चला (आज) दिवसभरात 3463 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसभरात 2584 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून 5 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत, शहरात सध्या 621 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 54 हजार 686 झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 30हजार832 झाली आहे.
आणि एकूण मृत्यू 5191 झाले असून आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 2लाख18हजार663 झाले आहेत.

52 हजार 930 ॲक्टीव रुग्ण-

आज 17 हजार 633 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 99 हजार 784 रुग्णांपैकी 4 लाख 37 हजार 185 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 52 हजार 930 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.93 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.47 टक्के आहे.

पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 24 हजार 654-

पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 लाख 24 हजार 654 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 62 हजार 35 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 89.09 टक्के आहे. पुणे विभागात शनिवारी बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 8 हजार 455 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 90, सातारा जिल्ह्यात 495, सोलापूर जिल्ह्यात 640, सांगली जिल्ह्यात 147 तर कोल्हापूर जिल्ह्यात 83 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

हेही वाचा-समाजहिताच्या कामांमध्ये अशोक चव्हाण यांनी राजकारण करू नये - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details