पुणे -पिंपरी- चिंचवडमध्ये नायजेरियन व्यक्तीच्या मारहाणीत एका परदेशी महिलेचा गर्भपात झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३३ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. फ्रेड बोहो (वय-४०) असे नायजेरियन आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही चार महिन्यांची गर्भवती होती. मात्र, ती बोलत नसल्याच्या रागातून त्याने पीडित महिलेच्या पोटावर लाथ मारली.
नायजेरियन व्यक्तीच्या मारहाणीत ३३ वर्षीय महिलेचा गर्भपात;गुन्हा दाखल - पुणे गुन्हे वृत्त
पिपंरी- चिंचवडमध्ये नायजेरियन व्यक्तीच्या मारहाणीमुळे एका परदेशी महिलेचा गर्भपात झाला आहे . या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित ३३ वर्षीय महिला राहते. ती गेल्या काही महिन्यांपासून एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. दरम्यान, आरोपी बोहो हा रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या व्यक्तीचा मित्र आहे. त्याने वांरवार पीडित महिलेचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार ३३ वर्षीय महिला ६ महिन्यापासून आरोपीशी बोलत नाही. या रागातून त्याने महिलेच्या पोटावर हाताने व पायाने जोरात मारल्याने महिलेचा गर्भपात झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.