पुणे -खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणातून मुठा नदीत ( Mutha River ) सोमवारी रात्री ११.३० पासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून खडकवासला धरणातून नदीपात्रात ३ हजार ४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात पावसाची नोंद - सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण ( Temghar Dam )क्षेत्रात १७० मिलिमीटर, वरसगाव धरण ( Varasgaon Dam ) परिसरात १३७ मिलिमीटर, पानशेत धरण ( Panshet Dam ) परिसरात १४१ मिलिमीटर, तर खडकवासला धरण ( Khadakwasla Dam ) क्षेत्रात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १०.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ३७.०१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी रात्री चारही धरणांत ९.४७ टीएमसी पाणीसाठा होता. सोमवारी रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी तब्बल १.३२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.धरणांमधील पाणीसाठा १०.७९ अब्ज घनफूट (टीएमसी) ३७.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टक्क्यांत -टेमघर धरणातील पाणीसाठी ०.६८ टक्क्यांवरून १८.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर, वरसगाव धरणातील पाणीसाठी ४.३० टक्क्यांवरून ३३.५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पानशेत धरणातील पाणीसाठी ३.८१ टक्क्यांवरून ३५.८२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर, खडकवासला धरणातील पाणीसाठी १.८६ टक्क्यांवरून ९४.०८ क्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आधी एकूण १०.७९ टक्के असणारा धरणातील पाणीसाठी हा १०.७९ टक्क्यांवरून ३७.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.