पुणे - पुण्यातील एसआरपीएफ ग्रुप दोनच्या 100 जवानांची एक तुकडी दोन महिन्यांपासून मुंबईत बंदोबस्त कामी होती. ही तुकडी सोमवारी पुण्यात परत आली. दरम्यान, यातील काही जवानांना सर्दी, खोकला अशी कोरोनासदृष्य लक्षणं आढळून आल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असता यातील तीन जवान कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
पुण्यातील एसआरपीएफच्या तीन जवानांना कोरोनाची लागण.. - पुण्यातील एसआरपीएफचे १०० जवान बंदोबस्तासाठी मुंबईत तैनात
पुण्यातील एसआरपीएफचे १०० जवान बंदोबस्तासाठी मुंबईत तैनात होते. त्यापैकी तीन जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून या तुकडीतील इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आलंय.
![पुण्यातील एसआरपीएफच्या तीन जवानांना कोरोनाची लागण.. 3 SRPF police found corona positive in Pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6915923-693-6915923-1587665426720.jpg)
पुण्एयातील सरपीएफच्या तीन जवानांना कोरोनाची लागण..
त्यानंतर यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून या तुकडीतील इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आलंय.