पुणे -येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच हिंदू नववर्षानिमित्त गणपतीला तब्बल ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण करण्यात आले आहे. या उपरण्याची किंमत अंदाजे १ कोटी रुपये इतकी आहे. व्यकंटेश हॅचरीजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी हे उपरणे अर्पण करण्यात आले.
दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण - marathi new year
व्यकंटेश हॅचरीजचे व्यंकटेश राव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रींच्या चरणी हे उपरणे अर्पण करण्यात आले. देवाने दिलेली ही संधी आहे. या संधीमुळेच एवढे करता येत आहे, असे मत व्यंकटेश हॅचरिजचे व्यंकटेश राव यांनी यावेळी व्यक्त केले.
![दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2930342-thumbnail-3x2-dagdu.jpg)
दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण
देवाने दिलेली ही संधी आहे. या संधीमुळेच एवढे करता येत आहे, असे मत व्यंकटेश हॅचरिजचे व्यंकटेश राव यांनी यावेळी व्यक्त केले.
दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ किलो सोन्याचे उपरणे अर्पण
मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडवानिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच मंदिरात गुढी उभारण्यात आली होती.
यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी सहपरिवार गुढी पूजन केले.