पुणे -जिल्ह्यातील चाकण येथील तळेगाव चौकात विचित्र असा अपघात घडला आहे. सिलेरिओ कार, स्कॉर्पिओ व कंटेनर यांच्यात हा अपघात घडला आहे. सिलेरिओ कारमधील तिघे जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. प्रफ्फुल सोनवणे, अक्षय सोनवणे व अविनाश अरगडे अशी मृत तरुणांची नावे आहेत.
सिलेरिओ कार ही चौकात उभी असताना शिक्रापूरच्या दिशेने येणारा कंटेनर व राजगुरूनगर या दिशेने येणारी स्कॉर्पिओ गाडी यांच्यामध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात झाला.
हेही वाचा-ठाण्यातील वेदांता रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार कोविड रुग्णांचा मृत्यू? चौकशीचे आदेश
अपघातात दोघे सख्खे चुलत भाऊ-
अपघातात दोघे सख्खे चुलत भाऊ आहे. ते वाकी बुद्रुक ता. खेड येथील रहिवाशी होते. तर तिसरा तरुण कडूस ता. खेड येथील रहिवाशी होता. या अपघातात प्रफ्फुल सोनवणे (27), अक्षय सोनवणे (23) व अविनाश अरगडे (28) ही जागीच ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. अक्षय हा चाकणमध्ये हॉटेल वेदिका या नावाने व्यवसाय चालवित होता.
हेही वाचा-आत्महत्येसाठी २२ वर्षीय तरुणी चढली ५ मजली इमारतीवर, पोलिसांनी समजूत घालण्याचा केला प्रयत्न
तीन जण जागीच ठार
शिक्रापूर बाजूकडून तळेगाव बाजूकडे जाणार कंटेनर (एम एच 04 एफ यु 0191) व उभी असलेली सेलोरो कारला (एम एच 14 ईयु 3326) भोसरीकडून राजगूनगरच्या बाजूला भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओची (एम एच 14 ईपी 4321) जोरात धडक झाली. या अपघातात चारचाकी वाहनातील तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन गंभीर जखमी आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. के. राठोड पुढील तपास करत आहेत.