पुणे- विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून यामध्ये ही काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. 20 व्या बाद फेरी अखेर जयंत आंसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मते मिळालेली आहेत. तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना पाच हजार 878 इतकी मते मिळाली आहेत. अद्याप ही मतमोजणी सुरू आहे.
या मतदारसंघातील पहिल्या पसंतीचा कोटा 25 हजार 114 इतका आहे. एकूण मतदान हे 53 हजार 10 इतके झाले होते. त्यातली 2,784 इतकी मतं अवैध ठरली असून 50 हजार 226 इतकी मतं मोजण्यात आली आहेत. आता शिक्षक मतदारसंघासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाचा अधिकृत निकाल शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.
भाजप-काँग्रेसमध्ये चुरस -
शुक्रवारी सकाळी निवडणुकीचा निकाल लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पदवीधरसाठी भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यात चुरस आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्यात चुरस आहे.