महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे शहरात एका दिवसात 291 नवीन कोरोना रुग्णांची नोंद;14 जणांचा मृत्यू - पुणे शहर कोरोना रुग्ण संख्या

पुणे शहरात शुक्रवारी कोरोनाचे 291 नवीन रुग्ण आढळले तर 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यात पाच महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. याच दिवशी 189 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चार हजारावर जाऊन पोहोचला आहे.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 23, 2020, 10:42 AM IST

पुणे - शुक्रवारी दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 291 नवीन रुग्ण आढळले. शहरात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यात पाच महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोनाचे एकूण 4 हजार 398 रुग्ण सापडले आहेत, यातील 2 हजार 371 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत महानगरपालिका कार्यक्षेत्रात 241 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी 189 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांत 1 हजार 786 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चार हजारांवर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत चालली असून दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details