पुणे -पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्ववैमनस्यातून कोंढव्यात एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास भगवा चौक शिवनेरी नगर गल्ली क्रमांक 12 या ठिकाणी घडली आहे. महेश लक्ष्मण गुजर ( वय- 24 ) रा. शिवनेरीनगर विठ्ठल मंदिरा शेजारी गल्ली क्रमांक 26 असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
राज पवार आणि त्याच्या साथीदारांनी गुजर याचा खून केल्याचा संशय आहे. गुजर याच्या बहिणीची एका तरुणासोबत मैत्री झाली होती. राज पवार हा त्या तरुणाचा मित्र होता. गुजर आणि त्या तरुणात या कारणातून अनेकदा भांडणे झाली होती. त्यातूनच हा खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी यावेळी दिली आहे.