पुणे- पुण्यात एक २४ वर्षीय महिला हुंडबळी ठरली आहे. सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून एका २४ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घराच्या ११ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या ( marriage women commits suicide in pune ) केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हंडेवाडी येथील नवरत्न एक्झॉटिका सोसायटीत ही घटना घडली असून दिव्या तरुण कानडे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल -याप्रकरणी मयत विवाहितेचा पती तरुण मदन कानडे, सासरा मदन कानडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर सासू सपना कानडे आणि दिर अरुण कानडे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शामराव आनंदा बनसोडे यांनी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
काय आहे प्रकरण -या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ रोजी तरुण कानडे आणि दिव्या कानडे या दोघांचे लग्न झाले होते. दिव्या ही सासरी नांदत असताना सासू-सासरे व दीर यांनी तिच्याकडे वारंवार पैसे व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. "तुझा बाप श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्याला कुठे मूल आहे? असे म्हणून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या सगळ्या त्रासाला कंटाळून काल रात्री दिव्या हिने राहत्या घराच्या अकराव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. असे शामराव बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या हेही वाचा -Minors Girl Rape : माणुसकीला काळीमा! पाच वर्षाच्या मुलीवर पित्यानेच केला बलात्कार