महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO : पुणे - अहमदनगर मार्गावर बस कारचा अपघात, 22 जण जखमी - bus turn one side Pune Ahmednagar road

पुणे - अहमदनगर महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण ( Bus car accident on Pune Ahmednagar road ) अपघात घडला. दुभाजक तोडून कार विरुद्ध बाजूला गेली आणि प्रवासी बसला धडकली. त्यामुळे, बस पलटी होऊन 22 जण जखमी झाले आहेत.

bus car accident on Pune Ahmednagar road
बस अपघात पुणे अहमदनगर महामार्ग

By

Published : Apr 11, 2022, 11:17 AM IST

पुणे -पुणे - अहमदनगर महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण ( Bus car accident on Pune Ahmednagar road ) अपघात घडला. दुभाजक तोडून कार विरुद्ध बाजूला गेली आणि प्रवासी बसला धडकली. त्यामुळे, बस पलटी होऊन 22 जण जखमी झाले आहेत.

घटनेचे दृश्य

हेही वाचा -वसंत मोरे आज राज ठाकरेंची भेट घेणार.. कार्यकर्त्यांशी साधला संवाद

भरधाव बस पलटी झाली आणि ती थेट हॉटेल परिसरात शिरली. या अपघातात बसमधील 22 जण जखमी झाले आहेत. कार चालकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कार चालकावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमींची नावे :या अपघातात दिपक नरेंद्र अगरवाल, वय 28 वर्षे, रा. अगरवाल नगर धुळे, माणिकचंद चिमणलाल जैन, वय 67 वर्षे, रा. शंकरशेठ रोड पुणे, हरिशकुमार विजयनंद दुबे, वय 33 वर्षे, रा. दापोडी पुणे. शरयू मनिश जाखेटे, वय 22 वर्षे, रा. देवपूर धुळे, प्रकाश आप्पासाहेब तुर्मतमक, वय 64 वर्षे, रा. मॉडेल कॉलनी पुणे, पुजा किसन खैरनार, वय 29 वर्षे, रा. केशवनगर मुंढवा पुणे, मुकेश वेदप्रकाश सुरवसे, वय 28 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी औरंगाबाद, शितल दिपक चौघुले, वय 33 वर्षे, रा. धानोरी पुणे, कुशाग्र दिपक चौघुले, वय 8 वर्षे, रा. धानोरी पुणे, नागेश हरिभाऊ शिंगाडे, वय 48 वर्षे, रा. वारजे माळवाडी पुणे, अशोक पुरुशोत्तम बोरसे, वय 65 वर्षे, रा. धायरी पुणे, कल्पना अशोक बोरसे, वय 60 वर्षे, रा. धानोरी पुणे, तेहरिम सज्जाद अहमद मोमिन, वय 21 वर्षे, रा. मालेगाव नाशिक, फायझा फरहद शोएब अहमद मोमिन, वय 21 वर्षे, रा. मालेगाव नाशिक, कृतिका मधुकर पाटील, वय 23 वर्षे, रा. देवपूर धुळे, प्रणीत गोकुळ बागूल, वय 34 वर्षे, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे, समर्थ मिलिंद वैद्य, वय 21 वर्षे, रा. साठेवाडा, एफसी रोड पुणे, रिटा संजय भगत, वय 40 वर्षे, रा. गुरूनानक सोसायटी धुळे, सौम्या संजय भगत, वय 15 वर्षे, रा. गुरूनानक सोसायटी धुळे, संदीप भरत षटकर, वय 35 वर्षे, रा. धायरी पुणे, नंदीनी राजसाहेब वाघ, वय 27 वर्षे, रा. विमाननगर पुणे, मोहम्मद युनुस इत्तेखार, वय 24 वर्षे, रा. मालेगाव, नाशिक एवढे जखमी झाले आहेत.तर गंभीर जखमींमध्ये, 1) सोमनाथ गोरक्ष शेंडे, वय 32 वर्षे, रा. आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर, 2) सोमनाथ मधुकर भोसले, वय 46 वर्षे, रा. श्रीगोंदा अहमदनगर 3) राजा भाईसाहेब सिंग, वय 42 वर्षे, रा. भोसरी पुणे यांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा -Birth Anniversary Of Jotiba Phule : सांस्कृतीक अंधार दूर करणारा समाजसुधारक! जोतिबा फुले यांची आज जयंती

ABOUT THE AUTHOR

...view details