महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरोग्यदायी चॉकलेट... पुण्यात गुणकारी हळदीपासून चॉकलेट निर्मिती, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत - Curcumin Chocolate Pune

मल्टी व्हिटॅमिन असलेल चॉकलेट, चिक्की पुण्यातील प्रमोद पानसरे आणि अमर थोपटे बनवत आहेत. त्यांनी 2019 ला सुरू केलेल्या वरद सप्लायर्स नावाच्या कंपनीत शेवगापासून चिक्की आणि औषधी गुणधर्म असलेल्या कुरकुमीनपासून बनवलेले भारतातील पहिले चॉकलेट हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक गुणकारी काम करत असल्याचा दावा केला आहे.

Curcumin chocolate amar thopte
कुरकुमीन चॉकलेट पुणे

By

Published : Jun 20, 2021, 7:58 PM IST

Updated : Jun 21, 2021, 12:16 PM IST

पुणे -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना होणार असल्याचे अनेक वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. लहान मुले औषधे, गोळ्या, सहजरित्या खात नाहीत, ते नेहेमी औषधे खायला रडत असतात, असे आपण नेहेमी पाहतच असतो. जर त्यांना चॉकलेटमधून औषधी गुणधर्म असलेले व्हिटॅमिन दिले तर ते आनंदात खाऊ शकतात. असेच मल्टी व्हिटॅमिन असलेल चॉकलेट, चिक्की पुण्यातील प्रमोद पानसरे आणि अमर थोपटे बनवत आहेत. त्यांनी 2019 ला सुरू केलेल्या वरद सप्लायर्स नावाच्या कंपनीत शेवगापासून चिक्की आणि औषधी गुणधर्म असलेल्या कुरकुमीनपासून बनवलेले भारतातील पहिले चॉकलेट हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच अनेक गुणकारी काम करत असल्याचा दावा केला आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी, प्रमोद पानसरे आणि अमर थोपटे

हेही वाचा -ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार - पंकजा मुंडे

काम सोडून 2019 मध्ये सुरू केली कंपनी

प्रमोद आणि अमर यांनी 2019 मध्ये एका खासगी कंपनीत काम सोडून स्वतः एक नवीन कंपनी सुरू केली. 2012 मध्ये प्रमोदने फूड टेक्नॉलॉजीमध्ये बिटेक करून स्वतः काही तरी सुरू करायचे, हा विचार करून त्याने काही वर्षे खजूरचा व्यवसाय केला आणि त्यानंतर काही कालावधीनंतर ते बंदही पडले. त्यांनतर घरची हालाखीची परिस्थिती असताना प्रमोदने एका कंपनीत काम केले आणि तिथे त्याला विविध फूड कशा पद्धतीने बनवता येतील, याबाबत माहिती मिळाली. आणि तिथे त्याला अमर थोपटे यांची साथ मिळाली. त्यानंतर या दोघांनी मिळून 2019 साली एक कंपनी सुरू केली आणि तिथे चिक्की आणि खाकरा बनवायला सुरवात केली. त्यांना पहिलाच ऑर्डर मुंबई ग्राहक पंचायतचीची आली. ते तयार करता करता कोरोनाच्या पाश्वभूमीवर पहिले लॉकडाऊन लागले आणि मग सर्वत्र हेल्दी फूडच महत्व वाढत गेले.

देशातील पाहिले कुरकुमीन पासून निर्मित चॉकलेट

कोरोनाच्या या महामारीत सर्वात गुणकारी म्हणून हळदकडे पाहिले गेले. त्याचे फायदेही मोठ्या प्रमाणात होऊ लागले. अशातच सर्वसामान्य नागरिकांना हेल्दी फूड द्यायचे हा विचार नेहेमी करणारे प्रमोद आणि अमर यांनी हळदमधील औषधी गुणधर्म असलेल्या कुरकुमीनपासून चॉकलेट बनवायला सुरवात केली आणि आज ते तीन प्रकारचे चॉकलेट बनवत आहेत. त्यांनी हे चॉकलेटचे प्रोडक्ट्स आता अक्षय तृतियाला लॉन्च केले आहे. हे चॉकलेट हळदमधील कुरकुमीन, काळी मिरी अर्क, विलायची अर्क आणि आलेचं अर्क हे पदार्थ टाकून बनवण्यात आले आहे आणि हे खूप गुणकारी ठरत आहेत. जगात दुसरे आणि भारतात पाहिले असे कुरकुमीनपासून बनवण्यात आलेले हे चॉकलेट आहे, अशी माहिती अमर थोपटे यांनी दिली.

सुरवातच ऑनलाईन व्यवसायाने केली

प्रमोद आणि अमर यांनी बनवलेल्या हेल्दी फूड आणि कुरकुमीनपासून बनवलेले चॉकलेट आज राज्यातील इतर शहरांमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून विकली जात आहेत. या दोघांनी सुरवातीपासूनच ऑनलाईन व्यवसायावर भर दिला. कोरोना काळात ऑफलाईनपेक्षा जास्त ऑनलाईनला मागणी असल्याने या दोघांनी ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. आणि आज जास्तीत जास्त ऑनलाईनच्या माध्यमातून व्यवसाय होत आहे, असेही प्रमोद यांनी सांगितले.

चिक्की, खाकरा ही आहे गुणकारी

कंपनीत चिक्की, खाकरा तयार केले जाते. ही चिक्की आणि खाकरा पूर्णपणे हेल्दी असून ते खूप गुणकारी आहेत. चिक्की ही शेवगा आणि अन्य पदार्थ टाकून बनवण्यात आली आहे, तर खाकरा गहू आणि इतर पदार्थ टाकून बनवण्यात आले आहे. वरद सप्लायर्स या कंपनीत बनवण्यात आलेले सर्व प्रोडक्ट हे गुणकारी असून याचा नागरिकांना फायदा देखील होत असल्याचे प्रमोद यांनी सांगितले.

हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनाला गर्दी, शहराध्यक्षासह 150 जणांवर गुन्हा

Last Updated : Jun 21, 2021, 12:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details