पुण्यात आज कोरोनामुक्त झालेल्या 184 रुग्णांना डिस्चार्ज, तर 106 नवीन रुग्ण
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 5522 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बरे झालेल्या 3059 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे- आज दिवसभरात कोरोना आजारातून मुक्त झालेल्या 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर नव्याने 106 रुग्ण सापडले आहेत. आज कोरोनाचे रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यात पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 5522 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 3059 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2190 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 284 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.