पुणे - पुण्यातील वाघोली येथील एका 18 वर्षीय तरुणाचा गणेश विसर्जनादरम्यान खाणीत बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन तासाच्या शोधानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. कृष्णा मारुती लोकरे (वय 18) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गणपती विसर्जनासाठी खोल पाण्यात गेलेला 18 वर्षे तरुण बुडाला; वाघोलीतील घटना
दोन तासाच्या शोधानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. कृष्णा मारुती लोकरे (वय 18) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अग्निशमन दलाचे जवान सुहास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा वाघोलीतील जाधव वस्ती या ठिकाणी राहण्यास होता. आज गणेशाचे विसर्जन असल्यामुळे घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी तो आई आणि मित्रासह वाघोलीतील एका खाणीवर गेला होता. गणपती विसर्जनासाठी खाणीमध्ये तो पोहत गेला. त्यानंतर परत पोहता येत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खाणीत बुडाला.
दरम्यान, कृष्णा बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यानंतर घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. त्यानंतर दहा मिनिटात बुडालेल्या कृष्णा लोकरे याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.