पुणे -पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी १४६ अर्ज दाखल झाले होते. यापैकी अर्जांच्या छाननीमध्ये १८ अर्ज बाद झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातील १५ अर्ज, तर शिक्षक मतदारसंघातील ३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये अनुक्रमे ७८ आणि ५० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, त्यानंतर या लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद-
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार पदवीधरसाठी ९३ उमेदवारांनी, तर शिक्षक मतदारसंघासाठी ५३ जणांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी पदवीधर मतदारसंघातील १५ अर्ज आणि शिक्षक मतदारसंघातील ३ अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
दोन्ही मतदारसंघामध्ये बंडखोरी-
दोन्ही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली आहे. पदवीधर मतदारसंघात भाजपने संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपचा मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेचे एन. डी. चौगुले यांनी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी अर्ज
दाखल केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप माने यांनी बंडखोरी केली आहे.
पदवीधर मतदारसंघात चुरस-