कॉसमॉस बँकेच्या लॉकरमधून 16 तोळ्यांचे दागिने चोरीला - लॉकरमधून 16 तोळ्यांचे दागिने चोरीला
कॉसमॉस बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशा चौधरी या महिलेने फिर्याद दिली आहे.
पुणे -धनकवडी येथील शंकर महाराज मठाजवळील कॉसमॉस बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशा चौधरी या महिलेने फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकर बिघडल्याने चोरी आली लक्षात - आशा चौधरी या नोकरी करतात. त्यांनी साधारण तीन महिन्यापूर्वी कॉसमॉस बँकेच्या धनकवडी शाखेतील लॉकरमध्ये त्यांच्याजवळील दागिने ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना बँकेचे कॉल आले की बँकेच्या लॉकरमध्ये बिघाड झाला असून तुमचे साहित्य घेऊन जा. त्यानुसार चौधरी बँकेत गेल्या. त्यांनी लॉकरमधील साहित्य काढून घरी घेऊन आल्या. त्यावेळी त्यामध्ये 16 तोळे सोन्याचे दागिने नसल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. त्यानंतर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.