महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sextortion In Pune : सावध! सेक्सटॉर्शनमध्ये अशी होते फसवणूक; वर्षभरात पुणे सायबरमध्ये १४०० तक्रार अर्ज - पुणे सेक्सटॉर्शन केस

सेक्सटॉर्शनच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन (Pune Cyber Police Station) येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले (sextortion applications at Pune) आहे. सेक्सटोर्शनमध्ये कशी फसवणूक होते, हे जाणून घेवू या.

Sextortion In Pune
सेक्सटोर्शनमध्ये कशी फसवणूक होते

By

Published : Oct 16, 2022, 12:25 PM IST

पुणे :पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Sextortion In Pune) घडली. सेक्सटॉर्शनच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन (Pune Cyber Police Station) येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले (sextortion applications at Pune) आहे. तर सेक्सटॉर्शनबाबत एक गुन्हा दाखल आहे. अशी धक्कादायक माहिती सेक्सटॉर्शनबाबत समोर आली आहे.


कशी होते फसवणूक ? पहिली स्टेज - सुरवातीला आपल्याला व्हॉट्सॲपवर एका अनोळखी नंबरवरून एका सुंदर मुलीचं फोटो येतो. आणि त्यांनतर एक हाय म्हणून मॅसेज येतो. आपण जर त्याला प्रतिसाद दिला, तर त्यातून हळूहळू ओळख केली जाते. आणि मग संभाषण वाढत (know how sextortion cheating done) जाते.



दुसरी स्टेज -आपण आलेल्या मॅसेजला प्रतिसाद दिला, तशी ओळख निर्माण होते. समोरून आग्रह केला जातो की, व्हिडियो कॉल वर बोलूया. त्यानंतर जेव्हा आपल्याकडून व्हिडियो कॉल केला जातो, त्यानंतर समोर असलेली मुलगी न्यूड होते. आणि ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. आणि चेहरा कॅप्चर होईपर्यंत हा व्हिडियो कॉल केला जातो. त्यानंतर लगेच व्हॉट्सॲपवर त्या व्हिडियो कॉलचा व्हिडियो येतो.



तिसरी स्टेज -जेव्हा हा व्हिडियो कॉल केला जातो, तेव्हा तेथून धमक्या सुरू होतात. आणि पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की- जर आपण पैसे नाही दिले, तर मी तक्रार दाखल करेल. अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल. आपण जर त्याला प्रतिसाद नाही दिला, तर खूप मॅसेज येतात. की काय करू ? पैसे देतात की पाठवून देऊ. त्यात ही जर आपण काहीही प्रतिसाद दिला नाही, तर पुन्हा एका अनोळखी व्यक्तीकडून कॉल येतो आणि तो म्हणतो, की मी दिल्ली पोलीस पोलीस मधून बोलतोय आपली तक्रार आली आहे. अशी थेट धमकी दिली जाते. याच धमकीला तरुण बळी पडतात व पैसे देतात. जर पैसे दिले गेले, तरी दोन ते तीन दिवसांनी पुन्हा कॉल येतो. व अजून पैश्यांची मागणी केली जाते. जर यात पैसे दिले गेले नाही, तर तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो. बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचं पाऊल (sextortion cheating) उचलतात.


सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400 अर्ज -पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शन चे 1400 हून अधिक अर्ज आले आहेत. पोलीस याचा तपास करत आहे. आमच्याकडे अर्ज घेऊन आलेल्या व्यक्तीकडून पूर्ण माहिती घेतली जाते. आणि त्याला समजावून सांगितलं जातं की-कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नये. आणि पॅनिक होवून कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नये, असे सांगितल जाते. जर अर्जदाराने पैसे भरले असेल, तर बँक डिटेल घेऊन तशी चौकशी केली जाते. तसेच व्हॉट्सॲप वरून माहिती घेऊन पुढील तपास केला (sextortion application) जातो.

पोलिसांकडून आवाहन-पुणे सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे, की अनोळखी व्यक्ती जर कोणीही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरून बोलत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच जर संशय आला तर लगेच संबंधित अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा. तसेच घाबरून जाऊ नका. कोणीही अधिकृत सोशल मीडियावर तुमचं व्हिडियो व्हायरल करू शकत नाही. तसेच जर कोणीही धमक्या दिल्या, तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल करा. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असंे आवाहन देखील यावेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details