पुणे - देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांची जयंती या दिवशी असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो (Children's Day in India). बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.
बालदिनानिमित्त अशाच एका विद्वान बालकाची कामगिरी सांगणार आहोत. तनिष वेंकटेश या अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने नुकतेच 'मराठा साम्राज्य' हे पुस्तक लिहिले व प्रकाशितही केले. मराठा साम्राज्याचा प्रेरणादायी व उज्वल इतिहास हा नवीन पिढीला माहीत व्हावा म्हणून तनिषने हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले आहे.
हे ही वाचा -Baalveer Special : वडिलांचे स्वप्न साकार करताहेत 'या' दोघी, जाणून घ्या छिंडवाड्याचा सोना-सारा सिस्टर्स बँड!
लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुुपयोग करत लिहिले पुस्तक -
गुडगाव येथे राहणारा तनिष व्यंकटेश हा सुट्टीसाठी पुण्यातील बिबेवाडी येथे राहणाऱ्या आजीकडे आला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. त्यानंतर काही दिवसात कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो तिथेच अडकला. दरम्यान तनिषच्या मनात मराठा साम्राज्याचा इतिहास इंग्रजी भाषेतून सर्वांसमोर आला पाहिजे, असा विचार बर्याच दिवसापासून सुरु होता. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करत त्याने हा विचार प्रत्यक्षात आणायचे ठरवले आणि सुरुवात केली.
हे ही वाचा -बाल 'चाणक्य' तबला वादानातून करून देतो भारतीय संस्कृतीची ओळख.. तबल्यातून काढतो अनेक 'ताल'
१७ घटनांचा इतिहास ११९ पानांमधून -
त्यानुसार तनिषने ऐतिहासिक पुस्तकाचे वाचन, ऑनलाईन माहितीच्या आधारे आणि इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन घेऊन “मराठा साम्राज्य” असे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते माधवराव पेशवे यांच्या दरम्यानच्या १७ घटनांचा इतिहास ११९ पानांमधून इंग्रजी भाषेतून जगासमोर आणण्याचे काम त्याने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारताच्या प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला..