पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तर याच प्रकरणातील आणखी पाच आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नम्रता पाटील - पोलीस उपायुक्त हेही वाचा -कोल्हापूर : मुलानेच केला स्वतःच्या वडिलांचा खून, कागल तालुक्यातील घटना
या संपूर्ण प्रकरणात एकूण 13 आरोपी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय २७, रा. हडपसर), अकबर उमर शेख (वय ३२, रा. जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (वय ३२), अझरूद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय २७), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय ३२), राजकुमार रामनगिना प्रसाद (वय २९), नोईब नईम खान (वय २४), असिफ फिरोज पठाण (वय ३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आणखी पाच आरोपींचा शोध सुरू आहे.
पीडित मुलगी ही 14 वर्षे वयाची आहे. 31 ऑगस्ट रोजी मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात गेली होती. तिथे गेल्यानंतर आरोपींनी मित्राची वाट पाहत असताना तिला घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षात बसवून वानवडी परिसरात घेऊन जात आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी रिक्षामध्ये, निर्जनस्थळी, जंगलात, लॉजवर आणि रेल्वेच्या कार्यालयात नेऊन बलात्कार केला.
- 8 आरोपी अटकेत तर आणखी 5 जणांचा शोध सुरू -
दरम्यान, आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी वानवडी पोलीस स्टेशन गाठत अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मागील चार दिवसांपासून या मुलीचा तपास सुरू होता. पोलिसांना ती रविवारी सायंकाळी सापडली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका रिक्षाचालकाला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतर आरोपींच्या मदतीने त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा -पुण्यात अल्पवयीन मुलीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये २ रेल्वे कर्मचारी आणि रिक्षाचालक