पिंपरी-चिंचवड - पिंपरी चिंचवड शहरात तेरा रिक्षाची तोडफोड करण्यात आली असून ही घटना वाकडमध्ये मध्यरात्री घडली. एका इमारतीच्या सुरक्षा राक्षकाने ही तोडफोड केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नव्या इमारतीसमोर या रिक्षा पार्क केला जातात, त्यामुळे इमारतीचे प्रवेशद्वार झाकले जाते. म्हणून सुरक्षारक्षक अनेकदा इथे वाहने पार्क करू नका असे सांगत होता. मात्र न ऐकल्याने त्याने वाहनांच्या काचा फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. किरण घाडगे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरक्षा रक्षाकाने फोडल्या 13 रिक्षा मध्यरात्री दगडाने फोडल्या रिक्षांच्या काचा
पोलिसांननी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील म्हातोबा नगर येथे सुरक्षा रक्षक किरण घाडगे याने मध्यरात्री दगडाने रिक्षांच्या काचा फोडल्या आहेत. या घटनेप्रकरणी आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. किरण घाडगे हा नवीन व्यवसायिक बांधलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षक आहे. इमारतीसमोरच तेथील काही रिक्षा चालक रिक्षा पार्क करतात. याप्रकरणी किरण घाडगे याने संबंधित रिक्षा चालकांना वारंवार रिक्षा पार्क करू नका अस सांगितले. मात्र, इमारतीच्या समोरच रिक्षा पार्क केल्या जात असल्याने संतापलेल्या किरणने मध्यरात्री मद्यपान करून तेरा रिक्षांची दगडाने तोडफोड केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा- संभाजीराजे, आंदोलनात चालढकल चालत नाही - चंद्रकांत पाटील