पुणे -पुण्यातील सिंहगड रोड येथील वडगाव खुर्द येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. स्कूल बस वळण घेत असताना मागच्या चाका खाली आल्याने एका 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्णव अमोल निकम अस मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (४९) रा. धनकवडी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
Pune Accident : स्कूल बसच्या चाकाखाली येऊन 12 वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, बसचालकावर गुन्हा दाखल - पुणे शाळेतील मुलाचा अपघात
पुण्यातील सिंहगड रोड येथील वडगाव खुर्द ( Singhgad Road Accident ) येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. स्कूल बस वळण घेत ( 12 Year Old Boy Accident In Pune ) असताना मागच्या चाका खाली आल्याने एका 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अर्णव अमोल निकम अस मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (४९) रा. धनकवडी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वडगाव खुर्द येथील मनपाच्या राजयोग सोसायटीतील मुरलीधर लायगुडे रुग्णालया समोर ब्लॉसम पब्लिक स्कूलची बस वळण घेत असताना मागच्या चाकाखाली आल्याने 12 वर्षीय अर्णव अमोल निकम ( रा. राजयोग सोसायटी वडगाव खुर्द) याचा अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातामुळे बसमधील शाळकरी मुले भयभीत झाली होती. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असल्यामुळे ब्लॉसम पब्लिक स्कूल बस विद्यार्थीना सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएलच्या बस थांब्या जवळ आली असता, बस थांब्यावर अर्णव आणि इतर विद्यार्थी उतरल्यावर स्कूल बस वळत असताना चालकाचे लक्ष नसल्याने काही कळण्याच्या आगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या विध्यार्थ्यांला जवळील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच अर्णवला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले.
हेही वाचा -Aaditya Thackeray : अयोध्येतील महंताची जीभ घसरली.. आदित्य ठाकरेंना दिली 'कालनेमी' राक्षसाची उपमा