पुणे -शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. नव्याने कोरोनाची बाधा झालेले 143 रुग्ण सापडले असून 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
दिवसभरात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू तर 119 जणांना डिस्चार्ज - पुणे कोरोना रूग्ण मृत्यू
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. नव्याने कोरोनाची बाधा झालेले 143 रुग्ण सापडले असून 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत पुण्यात एकूण ८ हजार २०५ जणांना कोरोनाची बाधा झाली यातील ५ हजार ३०४ रूग्ण उपचाराअंती बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयात 2 हजार 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजपर्यंत 403 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आठ हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे.